बुधवार दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीने “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक, २०२४” रद्द करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात प्राथमिक निवेदन सादर केले.आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते,आणि महाविकास आघाडीचे नेते तसेच स्थानिक नागरिक सहभागी झाले. समितीने म्हटले की, हे विधेयक लोकशाहीस बाधक असून, नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा आणते आणि प्रामाणिक संघर्ष करणाऱ्यांचा आवाज दाबतो असे निवेदनात म्हंटले आहे.