वडवणी तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पुराच्या पाण्यात तीन दिवसांपूर्वी वाहून गेलेला अक्षय बाबासाहेब जाधव, वय २८ वर्षे, यांचा मृतदेह आज गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता दुकडेगाव येथील बंधाऱ्यात सापडला आहे.अक्षय जाधव हे कुप्पा येथील रहिवासी होते. अचानक आलेल्या पुराच्या पाण्यामुळे ते नदीत वाहून गेले होते. घटनेनंतर सलग तीन दिवस शोधमोहीम सुरू होती. ग्रामस्थ, पोलीस आणि प्रशासनाने मिळून मोठ्या प्रयत्नांनंतर आज त्यांचा मृतदेह मिळाला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण