चाळीसगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शिंदी आणि जूनपाणी येथील शालेय विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात बसत आहे. माध्यमिक शिक्षणासाठी गणेशपूर येथे जाणाऱ्या या विद्यार्थिनींना वेळेवर बस मिळत नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.