भुसावळ येथील प्रोफेसर कॉलनीतील रहिवाशी विनोद बियाणी यांची मध्यप्रदेशातील ९ जणांनी फसवणूक केली आहे. संशयित ९ जणांनी परस्पर संगनमत करत विनोद बियाणी यांना शेत जमीन मुदतीन खरेदी न करुन देता परस्पर विक्री करत ३ कोटी ९६ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दिली.