रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी आपली घरे, दुकाने, फ्लॅट, फार्म हाऊस भाड्याने देताना किंवा विक्री करताना भाडेकरू व खरेदीदारांची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात कळविणे बंधनकारक राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास प्राप्त झाली आहे.