नागपूर शहरातील ऑटोमोटिव्ह चौकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने एटीएम सेंटरमध्ये घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्रयत्न फसला.ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. एटीएममध्ये कोणीही नसल्याचे पाहून आरोपीने एटीएम मशिन तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. मोठा आवाज झाल्याने जवळून जाणाऱ्या नागरिकांनी तो ऐकला. त्यांना संशय आल्याने त्यांनी एटीएम सेंटरकडे धाव घेतली.