आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ऐकविरा देवी मंदिर परिसरात आज सकाळी दहशतवादविरोधी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास पार पडलेल्या या मॉकड्रिलमध्ये विविध पथकांचा संयुक्त सहभाग होता. ही मॉकड्रिल पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त घुगे, गणेश शिंदे, रमेश धुमाळ व सहायक पोलीस आयुक्त खताळे यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली. जलद प्रतिसाद पथकाचे प्रभारी पोउपनि अजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्यू.आर.टी.