बुलढाणा शहरातील सहकार विद्या मंदिर येथे 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित ‘चला हवा येऊ द्या’ या विशेष कार्यक्रमाचे आमदार संजय गायकवाड यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते द्घाटन करण्यात आले.यावेळी बुलढाणा अर्बनचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर सुकेश झंवर, कोमलताई झंवर, रविकांत तुपकर, राजेश देशलहरा, ऍड. अजय दिनोदे, ऍड. कोठारी आदी उपस्थित होते.