भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विविध गणेश मंडळांना आज गणेशोत्सवानिमित्त ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजता च्या सुमारास भेट दिली. यावेळी सर्व गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन विराजमान झालेल्या बाप्पाची मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले. गणरायाच्या या मंगलमय उत्सवात सहभागी होण्याचा आनंद लाभला. सर्व मंडळांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी व उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा यावेळी दिल्या. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाने आणि विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.