बुलढाणा जिल्ह्यातील शेलगाव देशमुख येथे 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाजत गाजत सजवलेल्या बैलाची गावातून मिरवणूक काढण्यात आली यानंतर मारुती संस्थान येथे मंगलाष्टक सादर करून विवाह संपन्न करण्यात आला. या सोहळ्यात शेतकरी बांधव सजवलेल्या बैलाला घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते.