दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील नाईक नगर तांड्यात 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एकाने केलेल्या काठीच्या मारहाणीत जखमी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे. फिर्यादी मल्हारी रतन चव्हाण (वय 45, रा. नाईक नगर तांडा मंद्रुप, सध्या बाळे शिवाजीनगर तांडा, सोलापूर) यांनी मंद्रूप पोलिसात दिलेल्या फिर्याद दिली आहे.