प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका ठेकेदाराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लुखामसला तालुका गगेवराई येथील रहिवासी असलेले गोविंद जगन्नाथ बरगे (वय ३४) यांनी एका नर्तिकेशी असलेल्या प्रेमसंबंधातून स्वतःचे जीवन संपवले. मृत व्यक्तीच्या मेहुण्याने याबाबत १० सप्टेंबर रात्री आठच्या सुमारास फिर्याद दाखल केली आहे. पैसे आणि मालमत्तेसाठी होणाऱ्या वारंवारच्या मागणीला कंटाळून गोविंद यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.