राधा कृष्ण गणेश मंडळ, मुंडीपार येथे गणेशोत्सवाचे औचित्य साधून विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम व बास्केटबॉल खेळाचे आयोजन करण्यात आले. मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात गणपती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर लहानग्यांसाठी नृत्य, गायन, व वक्तृत्व यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये स्थानिक कलाकार व विद्यार्थीनी आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली.