माझी लाडकी बहीण योजना सर्वांची जबाबदारी आहे असं मत राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे 15 जुलै रोजी दुपारी सायंकाळी ५ वाजता व्यक्त केलं. हा निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून घेतला आहे. त्यामुळे हा सर्वांचाच निर्णय आहे असं त्यांनी सांगितलं. तर राज्यातील 288 मतदार संघात अजित दादा अर्थमंत्री म्हणून योग्य तो निधी देत आहेत. त्यामुळे सर्वजण आनंदी असल्याचं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं.