शांतीनगर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन डझनच्यावर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी ज्या ठिकाणी पैशांच्या वादातून गोंधळ घातला होता आणि वाहनांची तोडफोड केली होती, त्याच ठिकाणाहून पोलिसांनी 4 सप्टेंबरला रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांची धिंड काढली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुंडांनी धारदार शस्त्र घेऊन पैशांच्या वादातून मोठा गोंधळ घातला होता.