ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विधानांवर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास प्रत्युत्तर दिले. बन म्हणाले की, राऊत आज दिल्लीत ढोल वाजवत आहेत आणि काही पक्ष तटस्थ राहिल्याने आनंद साजरा करत आहेत. मात्र, घोडा मैदान दूर नाही आणि निकालानंतर असा ढोल वाजवावा, कारण एनडीएचा उमेदवार विजयी होईल आणि यूपीएच्या उमेदवाराचे राजकीय श्राद्ध घातले जाईल. बन यांनी संजय राऊत यांना महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणवून घेण्यावरही टीका केली.