कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 1 सप्टेंबरला दुपारी 5 वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार कळमना पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे साईकृपा सोसायटी येथील गॅस गोडाऊन जवळून दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव भूपेंद्र यादव असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे तीन वाहन जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.