पाकिस्तान मधील काही लोकांशी संपर्क ठेवले या माहितीवरून दहशतवादी विरोधी पथकाच्या नागपूर शाखेने कामठी मधून दोघांना 13 सप्टेंबरला सकाळी सहा वाजता च्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यवाहीमुळे खळबळ उडाली असून एसटी एसटी पथकाकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. एसटीएस च्या नागपूर युनिटने शनिवारी पहाटे दोघांना जुनी कामठी येथून चौकशीसाठी ताब्यात घेत ही कार्यवाही केली आहे. ताब्यातील हे दोघेही बऱ्याच काळापासून कामठीत राहत आहे ते समाज माध्यमांवर देखील सक्रिय आहे.