राज्याचे वनमंत्री कथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत वसई विरार महानगरपालिका मुख्यालय येथे विरार येथील इमारत दुर्घटनेबाबत आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत इमारत दुर्घटना उपाययोजना, अनधिकृत बांधकाम कारवाई, पुनर्वसन संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीस खासदार डॉ.हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, राजन नाईक , स्नेहा दुबे पंडित, अधिकारी उपस्थित होते.