मोहोळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवलेले अमोल उर्फ रॉकी बंगाळे यांनी आज शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी चार वाजता आझाद मैदान, मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते आज आझाद मैदानावर पोहोचून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर बंगाळे यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.