राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या भरतीबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी केला आहे.अनेक दिवसापासून प्रकल्पग्रस्तांना कृषी विद्यापीठाच्या भरतीमध्ये घेण्यात यावे यासाठी संघर्ष सुरु आहे. मात्र कृषी विद्यापीठाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे तमनर यांनी म्हटले आहे.आज सोमवारी सायंकाळी माध्यमंशी बोलताना त्यांनी ही माहीती दिली आहे.