तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला मारहाण तक्रार मागे घेण्यासाठी करगणी औट पोस्टमध्ये पोलिसांसमोरच मारहाण झाल्याची तक्रार मीना अतुल सोहनी (रा. गोमेवाडी) या महिलेने केली आहे. मारहाण करणाऱ्या प्राथमिक शिक्षकासह दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पीडितेने केली आहे.