आज मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास भाजपचे प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी केंद्र सरकार गरिबांना मोफत धान्य देत असल्याने त्यांचे पोट का दुखते, असा प्रश्न कुलकर्णी यांनी विचारला आहे. गरिबाच्या ताटातील अन्न हिसकावून का घेता, असे म्हणत त्यांनी राऊत यांच्यावर गरिबांचा अपमान केल्याचा आरोप केला. राजकारणापायी गरिबांच्या पोटावर पाय मारू नका, असेही ते म्हणाले.