*मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं,भुजबळांचा गैरसमज दूर करणार : राधाकृष्ण विखे पाटील* *भुजबळ कोर्टात जाणार नाहीत : विखे* मंत्री छगन भुजबळ यांनी जीआरला विरोध दर्शवत कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. यावर विखे म्हणाले,मला वाटत नाही की भुजबळ कोर्टात जातील. मी स्वतः त्यांची भेट घेऊन वस्तुनिष्ठ माहिती देणार आहे. खरंतर ओबीसींना आरक्षण मिळालं तेव्हा मराठा समाजाने काही विरोध केला नाही. त्यामुळे यात कुणीही प्रतिष्ठेचा प्रश्न करणार नाही. *