आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता कळवेश्वर नगरपरिषद कार्यालय येथे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नगरपरिषद येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत आक्रमक पवित्रा घेतला. चार चार महिने होऊनही कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही त्यामुळे कर्मचारी हलाखीचे जीवन जगत आहेत येत्या दोन दिवसात कर्मचाऱ्यांची वेतन जमा करा नाहीतर काम केले जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते