राष्ट्रीय लोककलावंत, दिव्यांग, निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघर्ष समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी ह.भ.प. प्रकाश महाराज मगर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. प्रकाश महाराज हे तेजस्वी महाराज वरोडी संस्थानचे विश्वस्त असून ते प्रख्यात भागवत कथा रामानुजाचार्य आहेत. तसेच वारोडी ते शेगाव या पालखी सोहळ्याचे ते मुख्य संचालक म्हणून अनेक वर्षे अखंड सेवा बजावत आहेत.