एप्रिल 2022 ते 27 मे 2022 दरम्यान पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीतील महाराज परिसरात असलेल्या पडक्या घरात 29 वर्षीय आरोपी मयूर मोडक याने अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केले होते. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. सर्व पुराव्या अंति आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला कलम आठ पोस्को मध्ये पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये अशी शिक्षा सुनावली.