इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलाद सण साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने पालघर शहरातील सुन्नी जामा मश्चिद ते ईदगाहपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव लहान मुले सहभागी झाले. शहरात ठीकठिकाणी जुलूस मधून जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना खाऊ, मिठाई, सरबतचे वितरण करण्यात आले. अत्यंत उत्साहात पालघर शहरात ईद-ए-मिलाचा सण साजरा करण्यात आला.