बुलढाणा जिल्हा कामगार कार्यालयामध्ये विविध तांत्रिक अडचणीचा हवाला देत अधिकृत कामगारांची अडवणूक होत असून या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.बुलढाणा तालुका प्रमुख अमोल रिंढे यांनी आज 4 सप्टेंबर रोजी दुपारी कामगार कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.यापुढे कामगारांना नाहक त्रास दिल्यास अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा अमोल रिंढे यांनी दिला आहे.