पालघर पूर्वेकडून पश्चिमेकडे ये जा करण्यासाठी रेल्वेने नवली रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर त्या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या भुयारी मार्ग नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला. पावसामुळे या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पाण्यातून एका दुचाकीस्वाराने आपली दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली त्यानंतर स्थानिकांनी मदत करत वाहून गेलेली ही दुचाकी पाण्याबाहेर काढली. घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.