वाघोली परिसरातील 10 एकर जमीन बनावट दस्ताऐवजांच्या आधारे ताब्यात घेण्याच्या प्रयत्नातून अपहरण, मारहाण व जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी एंफासिस ग्रुपचे भागीदार राजेश गोयल, नवीन गोयल, रितेश मित्तल, निलेश अगरवाल, किशोर मित्तल, रितेश अगरवाल यांच्यासह एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.