माळकुर्प येथील कृषीनाथ ग्रीन एनर्जी कारखान्याचे दूषित पाणी हे स्थानिक शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये उतरून सतत तीन वर्षांपासून झालेले नुकसान आणि स्थानिक मुलांना कामावरती प्राधान्य देण्यात यावं आणि न्याय मिळावा यासाठी पुकारलेले सरपंच संजय शंकर काळे आणि ग्रामस्थ माळकुर्प यांचे आंदोलन पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथजी दाते यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले आहे. सरपंच संजय काळे यांनी म्हटले की कारखाना चालू झाल्यापासून ॲसिडयुक्त घाण पाणी शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये उतरून सर्व जमीन नापीक झाली