उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्य रस्त्यावर २४ ऑगस्ट रोजी सांयकाळी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस अचानकपणे बंद पडली,एसटी बस बंद पडल्यामुळे काही वेळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली,वाहतूक चारही बाजूने जॅम झाली होती,अखेर एसटी बसला छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर धक्का देण्याची वेळ आली,एसटी बसला पोलीस कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून ते बस्थान पर्यंत एसटी बसला धक्का देत चौकातील वाहतुकीची कोंडी सुरळीत केली