जालना जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव सुरु असताना दि. 6 सप्टेंबर 2025 रोजी गणपती विसर्जन होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता मोती तलावालगत बनविण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंडाचे पूजन आणि लोकार्पण आमजदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कुडामध्ये गणपती विसर्जन, देवी विसर्जन करता येणार असून छट पुजेसाठी देखील सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने गणपती विसर्जनाची जोरदार तयारी करण्यात आली.