आज दिनांक 26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 3वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी जाफराबाद भाजपा संपर्क कार्यालयावर सेवा पंधरवाडा या योजनेअंतर्गत उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध योजने संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले आहे, यामध्ये पंतप्रधान आवास योजना महिलांसाठी विविध योजना व उपाय योजना या संदर्भात मार्गदर्शन केले आहे यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित झाले होते.