भंडारा जिल्ह्यामध्ये मा माजी जिल्हा न्यायाधीश एस आर त्रिवेदी, सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा समिती स्थापन केली आहे. या चमूने २९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास कऱ्हांडला येथील जिल्हा परिषद शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी केली. भौतिक सुविधे सोबत विद्यार्थ्यांची गुणवत्ताही तपासण्यात आली. यावेळी चमूने गुणवत्ते बाबत समाधान व्यक्त केले.