चाळीसगाव शहरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळल्याने शहराची अक्षरशः वाताहत झाली आहे. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन हे पाणी शहराच्या सखल भागांत आणि अनेक प्रमुख वसाहतींमध्ये शिरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातील मुख्य कॉम्प्लेक्समध्ये पाणीच पाणी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक उच्चभ्रू आणि व्यावसायिक भागांना मोठा फटका बसला आहे.