राज्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे, प्रचंड महागाई व बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला गेला,त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली,याला सरकार जबाबदार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह समोर आज दि.1 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले.