धुळे जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आणि जिल्हा प्रशासनाच्या अहवालाला प्रतिसाद देत, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या धुळे जिल्हा सेवा समितीने 80 फुटी रोड परिसरातील श्री बाबा आप्पा वराडे डॉक्टर हाऊस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले.