हिंगोली शहरात प्रसिद्ध असलेले चिंतामणी गणपती मंदिरात आज सकाळी सहा वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे सायंकाळी चार वाजेपर्यंत ही मोठ्या प्रमाणात गर्दी होती आज 12 ऑगस्ट रोज मंगळवार या दिवशी येणाऱ्या संकट चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणतात ही चतुर्थी गणपतीला समर्पित असून तिला विशेष महत्त्व आहे या दिवशी उपवास केल्याने गणपतीचा पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात अशी मान्यता आहे त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.