महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मागे घ्यावे, रद्द करावे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अधिवेशनात पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले असले तरी हे घटना विरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारे आहे.त्यामुळे हे विधेयक रद्द करावे या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी केला आहे. गोंदिया येथे जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.