उपराष्ट्रपती पद हे राष्ट्रपती नंतरचे दुसरे देशातील सर्वात मोठे संविधानिक पद आहे. सतराव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एनडीएकडून सी.पी. राधाकृष्णन तर विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या वतीने पी. सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या मैदानात आहेत. पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान केले. संसद भावनातील वसुधा येथे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावला.