अजित पवार म्हणाले की, असं काही नाही, मी स्टॅम्पवर लिहून देऊ का? असं काही नाही. आम्ही तिघे एकत्रित बसतो, त्यावेळेस कधीही असं जाणवलं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही चांगले काम करतात. राज्यात चांगला कारभार व्हावा, असा आमचा तिघांचा प्रयत्न असतो. आमच्या तिघांचं व्यवस्थित सुरू आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.