बांभोरी शिवारातील गालापूर रोडवरील फैजल शेख यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जणांना अटक करण्यात आले आहे. ही कारवाई गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता करण्यात आली. पोलीसांनी रोकड, मोबाईल आणि ३ मोटारसायकली असा एकुण १ लाख ६६ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाने शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पत्रकाद्वारे कळविले आहे.