राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबरला यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे.यवतमाळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रसंत मोरारी बापू यांच्या राम कथा पर्वामध्ये ते भेट देणार आहे.यानंतर पोस्टल मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.