भाजप नेते हर्षवर्धन जाधव यांनी इचलकरंजी पाकिस्तान असल्याची टिका केली, त्यावर या नेत्यांना दुसरं काही दिसत नाही. देशाचे राज्याचे गृहमंत्री भाजपाचे आहे, आधी सिल्लोडला पाकिस्तान म्हणले इतके दिवस पाकिस्तान चालत होते का? अशी टीका विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी अजब नगर येथे 16 जुलै रोजी दुपारी 12 वाजता केली. कंगना राणावत मुंबईमध्ये येऊन पाक व्याप्त काश्मीर सारखं वाटत असल्याचं बोलली होती ती आता यांची खासदार आहे. गृहखाते तुमच्याकडे आहे मग कारवाई करा अशी टीका दानवे यांनी केली.