गुन्ह्यांचा तपास अधिक जलत आणि वैज्ञानिक पद्धतीने करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झाली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने ही व्हॅन रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिली आहे. या व्हॕनमुळे गुन्ह्याच्या घटनास्थळावरून पुरावे गोळा करणे त्यांचे संरक्षण करणे आणि ते न्यायालयात सादर करणे अधिक सोपे होणार असून यामुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.