माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर पंचायत समिती येथे जनता दरबार घेतला. दरम्यान, शेतकरी तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांनी या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना विविध कर्जासंदर्भात अडचणी आणल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.