लांजा येथील २२ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास सुमारास मठ येथे घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची खबर राजेश शांताराम मठकर (वय ४४, रा. मठ मठकरवाडी) यांनी लांजा पोलिसांनी दिली. त्यांचा मुलगा भूषण हा घरातील गणपतीची हातगाडी ही वरच्या घरी ठेवून येतो असे सांगून शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेला होता.मात्र तो घरी परत आला नाही