तालुक्यातील ग्राम गिरोला-पांढराबोडी येथील जयपाल सोमा किरसान (वय ६०) यांचा गिरोला बसस्थानकाजवळ ट्रॅक्टरने अपघात झाला. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत बुधवारी (दि. २७) सायंकाळी ६:३० वाजता उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे